
मोखाडा : मोखाडा तालुक्यातील 27 ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या 42 रोजगार सेवकांचे माहे डिसेंबर 2024-25 या आर्थिक वर्षातील तब्बल 5 महिन्यांचे मानधन शासनाने थकवले आहे. त्यामुळे रोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.परिणामी 42 रोजगार सेवकांनी बुधवार 5 ऑगस्ट पासून संपाचे हत्यार उपसले असून नरेगाचे काम थांबवले आहे. त्यामूळे नरेगाशी निगडीत सर्व विभागांच्या रोहयोच्या कामांना खिळ बसली असून त्याचे दुरगामी परिणाम मात्र, मजूरांच्या कुटूंबाला आणि बालबच्च्यांना भोगावे लागणार आहेत.