panchayat samiti mokhada
sakal
मोखाडा - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रशासनाकडून पंचायत समितीच्या सभापती पदाची सोडत काढली असुन जिल्ह्यातील वसई, मोखाडा, डहाणू, विक्रमगड या चार पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती महिला राखीव झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चार पंचायत समितीवर महिलाराज असणार आहे. सभापतिपद महिला राखीव झाल्याने, मोखाड्यात राजकीय पक्षाची रणनीती बदलणार आहे.