
Mokhada Police Urge Citizens to Secure Homes Against Housebreaking and Thefts During Festival Holidays.
Sakal
मोखाडा : दिवाळी सणाचा आनंद साजरा करताना आपल्या घराची आणि मालमत्तेची सुरक्षितता काळजी घेणे आवश्यक आहे. खरेदी, नातलग भेटी आणि दिवाळी सणाच्या सुट्टी मुळे बहुतांश नागरीक, कर्मचारी गावाकडे जातात. त्यामुळे घरे रिकामी राहतात. हीच संधी साधून चोरटे घरफोडी करून ऐवज व मालमत्ता लुटून नेण्याच्या घटना घडतात. ही घरफोडी टाळण्यासाठी मोखाडा पोलीसांनी संरक्षणात्मक सुचना समाजमाध्यमाद्वारे नागरीकांना दिल्या आहेत.