
मोखाडा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मोखाडा शाखेने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेची मोखाडा बाजारपेठेतुन अंतयात्रा, काढत पत्ते उधळून मुसळधार पावसात आंदोलन केले आहे. तसेच शेतकर्याना कर्ज माफीची मागणी करून, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले आहे. त्यानंतर मोखाडा बसस्थानक चौकात प्रतिकात्मक प्रेताचे दहन केले आहे.