
Mokhada's ready-to-harvest paddy crop submerged by late monsoon fury
Sakal
मोखाडा : यंदा पावसाने हाहाकार माजवून शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. शासनाने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करून मदतही जाहीर केली आहे. ऊर्वरीत परिपक्व व हाताशी आलेल्या पीकाच्या कापणीची लगबग सुरू असतांना, मोखाड्यात परतीच्या पावसाने रविवारी 19 ऑक्टोबर ला धुमाकूळ घालत ऊभे पीक शेतातच आडवे केले आहे. तर काही भागात कापुन ठेवलेले पीक पाण्यावर तरंगु लागले आहे.