
मोखाडा : एकीकडे मोखाडा तालुक्यात बालमृत्यु आणि मातामृत्यूचे दृष्टचक्र सुरू असताना हे आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. तसेच विविध पॅटर्न राबवणे आवश्यक असताना, दुसरीकडे मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील मंजूर 7 तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्वच्या सर्व पद रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व एक कायम वैद्यकीय अधीक्षकाला संपूर्ण ग्रामीण रुग्णालय आणि तालुक्यातील नागरीकांच्या आरोग्याची धुरा सांभाळावी लागत आहे.