मोखाडा : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासींना प्यावे लागले चिखलाचे पाणी!  

हंडाभर पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट
Mokhada water scarcity
Mokhada water scarcitysakal media

मोखाडा : जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम वावरं - वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाना आणि रेठीपाडा या गावपाड्यांमध्ये मार्च महिन्यात पाणी टंचाईला (Water scarcity) सुरूवात झाली आहे. विहीरी कोरड्या पडल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणी पुरवठा (Tanker water supply) करण्याची मागणी करूनही पाणी न मिळाल्याने, अखेर ग्रामस्थांना डबक्यातील चिखलाचे पाणी पिण्याची (People drinks unclean water) भीषण परिस्थिती येथील आदिवासीवर ओढवली आहे. आता तेही पाणी आटल्याने हंडाभर पाण्यासाठी दिवसरात्र विहीरीवर खडा पहारा द्यावा लागतो आहे अथवा तीन किलोमीटरची पायपीट (Three km walk for water) करून हंडाभर पाणी आदिवासींना डोक्यावर आणावे लागते आहे. 

Mokhada water scarcity
यशवंत जाधव प्रकरण: कॉर्पोरेट मंत्रालयाची मुंबई पोलिसांकडे पत्राद्वारे तक्रार

जव्हार तालुक्यात पाणी टंचाईला सुरूवात झाली असून सध्यस्धितीत तालुक्यात  3  गावपाड्यांना  2  टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्याचे आणि तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम वावरं - वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाना आणि रेठीपाडा या ठिकाणी मार्च महिन्यापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील विहीरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी  27  मार्च ला तहसीलदार आणि गटविकास अधिकार्याकडे केली आहे.

मात्र, 10  दिवसानंतर ही टॅंकर चे न मिळाल्याने येथील आदिवासींनी थोडासा नैसर्गिक श्रोत असलेल्या झर्याच्या ठिकाणी श्रमदान करून तेथे डबके तयार केले. तेथील गाळ आणि चिखल मिश्रित पाणी पीऊन आदिवासींनी आपली तहान भागवली आहे. त्यामुळे येथील आदिवासींचे आरोग्य धोक्यात आले आहे. वावर - वांगणी भागात सन 1992 -93  सालात कुपोषण आणि भुखबळी ने  125  हून अधिक बालकांचा बळी गेलेला आहे. या घटनेने महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता. या घटनेची चर्चा जागतिक स्तरावर युनोत ही चर्चीली गेली होती. हाच भाग आता भीषण पाणी टंचाई च्या विळख्यात अडकला आहे. त्याकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. 

Mokhada water scarcity
राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची 7 हजार पदं रिक्त

दरम्यान, आता या झर्याचाही श्रोत आटला आहे. त्यामुळे नागरीकांना दिवसरात्र कोरड्या विहीरीत वळेल तसे दिवसरात्र हंडाभर पाण्यासाठी खडा पहारा करत जीव टांगणीला लावावा लागतो आहे. येथील पाणी कुटूंबासाठी पुरत नसल्याने, तीन किलोमीटर अंतरावर च्या वावर आणि डाहुळ येथुन पायपीट करत हंडाभर पाणी आणावे लागते आहे. या दोन्ही गावपाड्यांची  1  हजार  30  लोकसंख्या असुन  338  जनावरे आहेत. या सर्वांना भीषण पाणी टंचाई चा सामना करावा लागतो आहे.

येथील ग्रामपंचायतीने  27  मार्च ला टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. सर्व सरकारी धोरण धाब्यावर बसवून प्रशासनाने  पांच दिवसांनी, येथील टंचाईची पाहणी केली आहे.  4  एप्रिल ला पंचायत समिती प्रशासनाने टॅंकर मंजुरी चा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाला सादर केला आहे. या प्रक्रियेला  10  दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अजुनही टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला नाही.  

सरकारी धोरणानुसार टंचाई ग्रस्त भागात पाणी पुरवठ्याची मागणी येताच, तेथे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि भुजल तज्ञांनी  24  तासांत पाहणी करणे अपेक्षित आहे. तसेच टंचाई ग्रस्त भागाला  48  तासांत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करणे बंधनकारक आहे. मात्र, टॅंकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी करून  10  दिवसानंतर ही येथील आदिवासींना पाणी मिळालेले नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाने शासनाचे धोरण धाब्यावर बसवून, सरकार चे नियम बासणात गुंडाळुन ठेवले आहेत. दरम्यान, आपण टंचाई ग्रस्त भागाची पाहणी केल्याची माहिती, गटविकास अधिकारी समीर वठारकर यांनी दिली आहे. 

आमच्या भागात तिव्र पाणी टंचाई आहे. मागणी करूनही टॅंकर चे पाणी अजुन मिळालेले नाही. टंचाई भागाची पाहणी करण्यासाठी कोणताही तालुक्याचा अधिकारी आलेला नाही. केवळ तलाठी आणि दोन कर्मचार्यांनी पाहणी केली आहे. त्यालाही सात दिवस ऊलटले आहे. श्रमदानाने डबके खोदले होते त्यातील चिखलाचे पाणी पीऊन जीव जगवला. आता त्याचेही पाणी आटले आहे. आता दिवसरात्र महिलांचा हंडाभर पाण्यासाठी विहीरीवर खडा पहारा आहे. येथे पाणी मिळाले नाही तर तीन किलोमीटर हुन डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागते आहे. 

- सुनिल रतन जाबर, सागपाना, जव्हार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com