Nawab Malik: नवाब मलिकांना दिलासा नाहीच! सुनावणीदरम्यान हायकोर्टानं काय म्हटलंय वाचा

मनी लॉंडरिंगच्या केसमध्ये नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
File Atrocities Against ncp Nawab Malik Sanjay Wankhede crime washim
File Atrocities Against ncp Nawab Malik Sanjay Wankhede crime washimSakal

मुंबई : मनी लॉंडरिंगच्या केसमध्ये सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळं मलिक यांचा आणखी काही दिवस तुरुंगातला मुक्काम कायम राहणार आहे. (Money laundering case Bombay HC refuses to urgently hear bail plea of Nawab Malik)

आपल्या केसवर तातडीनं सुनावणी घेण्यात यावी अशी याचिका नवाब मलिक यांच्यावतीनं मुंबई हायकोर्टात करण्यात आली होती. पण हायकोर्टानं या तातडीच्या सुनावणीला नकार दिला. तसेच यावरील पुढील सुनावणी ६ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली. तसेच दोन आठवड्यांत मलिक यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत माहिती देण्यात यावी, असे निर्देश हायकोर्टाने ईडीला दिले.

हे ही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com