Anil Deshmukh: ईडीची कारवाई द्वेषपूर्ण; मूलभूत अधिकारांचा भंग

ईडिने मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणात देशमुख यांना समन्स बजावले आहे. मात्र अद्याप देशमुख यांनी चौकशीला हजेरी लावली नाही.
anil deshmukh
anil deshmukhsakal News
Updated on

मुंबई : भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांमध्ये ईडिने सुरु केलेली कारवाई द्वेषपूर्ण आहे. यामुळे माझ्या मूलभूत अधिकारांचा भंग होत आहे, असा आरोप आज माजी ग्रुहमंत्री अनिल देशमुख यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

ईडिने मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणात देशमुख यांना समन्स बजावले आहे. मात्र अद्याप देशमुख यांनी चौकशीला हजेरी लावली नाही. तसेच या समन्सना आणि ईडीच्या कारवाईला सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. आज न्या नितीन जामदार आणि न्या सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

ईडिने सुरु केलेली कारवाई अयोग्य आहे, त्यामुळे या कारवाईपासून संरक्षण द्यावे, तपास अधिकार्यांपुढे औनलाईन हजेरी लावण्यासाठी आणि कागदपत्रे दाखल करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी याचिकेत केली आहे. यापूर्वी अनेकदा ईडीच्या अधिकार्यांपुढे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता हजेरी लावली आहे, आणि देशमुख ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामुळे आता कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रत्यक्ष हजेरी लावण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वतीने करण्यात आला.

देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका केली आहे, असे ईडिच्या वतीने सांगण्यात आले. शुक्रवारी यावर पुढील सुनावणी होणार आहे. ईडिने आतापर्यंत पाच समन्स बजावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com