पैसे नाही क्रेडीट नोट मिळणार; आर्थिक तंगीवर BMCचा उतारा 

पैसे नाही क्रेडीट नोट मिळणार; आर्थिक तंगीवर BMCचा उतारा 
Updated on

मुंबई : कोविड लॉकडाऊन मुळे महानगर पालिकेच्या उत्पन्नात कमालीची घट झाली असल्याने आता कंत्राटदारांना कामाचे पैसे देण्या ऐवजी क्रेडीट नोट देण्यात येणार आहे.महानगर पालिकेला प्रकल्पग्रस्तांसाठी 35 हजार घरे बांधून देणाऱ्या कंत्राटदारांना हे क्रेडीट नोट देण्याचा पालिकेचा विचार आहे. 

महानगर पालिकेने स्वत: प्रकल्पग्रस्तांची घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी खासगी जमिन मालकांकडून अर्ज मागितले आहे.ही घरे बांधण्यासाठी जमिन उपलब्ध करुन देणाऱ्या मालकांना पालिका हस्तांतरणीय विकास हक्क (टिडीआर) देण्यात येणार आहे.तर,जमिन मालकांनी त्याच्या भुखंडावर घरे बांधून दिल्यास त्याना क्रेडीट नोट देण्यात येणार आहे.हे क्रेडीट नोट पालिकेचा मालमत्ता कर,दंड भरण्यासाठी वापरता येऊ शकतात.तसेच,त्यांची विक्रीही करता येऊ शकते."पीएपी बाबत आलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.ही घरे बांधून घेण्याची प्रक्रिया पुर्ण पणे कॅश लेस असेल' असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

क्रेडीट नोट देण्याच्या निर्णयावर काही आक्षेपही नोंदवले जात आहेत.या निर्णयामुळे पालिकेवर अधिक आर्थिक संकट येऊ शकते.क्रेडीट नोटचा कर चुकविण्यासाठी वापर झाल्यास पालिकेला पैशांच्या स्वरुपात उत्पन्न कसे मिळेल असा मुद्दा पालिकेतील समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी उपस्थीत केला.तसेच,त्या क्रेडिट नोटचे दर कसे ठरवणार त्यासाठी चर्चा झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. टीडीआरच्या वापरातही काही वेळा आक्षेप घेतले जातात.यात,काही ठराविक विकसकांचा फायदा होत असल्याचा आरोप होत आहे.टीडीआर मध्ये एखाद्या ठिकाणचा विकास हक्क दुसऱ्या ठिकाणी वापरता येतो.मात्र,त्यासाठी पालिकेचे काही नियम आहेत. 

खर्चवाचविण्यासाठी आता पर्यंत काय काय 
- 2 हजार 500 कोटी रुपयांच्या विकास कामांना कात्री 
- आर्थिक तरतुद असलेल्या कामेही काटकसरीने करावीत 
- आर्थिक तरतुदी पेक्षा जास्त खर्च होणार नाही अशा पध्दतीने निवीदा मागवाव्यात. 

काय असतं क्रेडीट नोट 
क्रेडीट नोटला जमा पत्र असेही म्हटले जाते.यात विकसकांनी इमारत बांधून दिल्यावर त्याच्या शुल्कापोटी पैसे न देता पालिका हमी असलेले पत्र देणार.या हमीपत्रा व्दारे संबंधीत व्यक्ती पालिकेचे शुल्क मालमत्ता कर भरु शकेल.तसेच,त्या हमी पत्राची विक्रीही करु शकेल.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com