मोनिकाचा उपचारांना चांगला प्रतिसाद, फक्त व्हिडिओ कॉलवरुनच रोज माय-लेकीची भेट

मोनिकाचा उपचारांना चांगला प्रतिसाद, फक्त व्हिडिओ कॉलवरुनच रोज माय-लेकीची भेट

मुंबई, 24:  मुंबईत लोकल ट्रेन अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मुंबईच्या मोनिका मोरेला नवे हात मिळाले. 28 ऑगस्ट 2020 रोजी मोनिकावर मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. त्या दिवसापासून आजपर्यंत मोनिकाच्या आईने मोनिकाला फक्त व्हिडिओ कॉलवरच पाहिले आहे. ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर गेल्या एक महिन्यापासून दररोज  सकाळी आणि संध्याकाळी मोनिकाच्या आईला व्हिडीओ कॉलवरुन मोनिका सोबत संवाद साधण्यासाठी मदत करत आहेत. 

मोनिका गेल्या एका महिन्यापासून हात प्रत्यारोपणानंतर ग्लोबल रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्यासोबत तिची आई ही रुग्णालयातच आहे. मोनिकाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून तिच्या जवळ कोणालाही सोडले जात नाही. आता तिला आयसीयूमधून स्पेशल रुममध्ये शिफ्ट केले आहे. तिची प्रकृती स्थिर असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देतेय. शिवाय, तिला फिजीओथेरपीचे डॉक्टर्स दिवसातून दोन वेळा हालचाल व्हावी म्हणून चालायला ही सांगत आहेत अशी माहिती मोनिकाची आई कविता मोरे यांनी दिली आहे. 

मोनिकाची तब्येत आता ठिक असून ती रोज व्हिडीओ कॉलवर माझ्याशी बोलते. माझ्या सर्व प्रश्नांना उत्तरं देते. आता हळूहळू चालते ही. शिवाय, तिला ही हात मिळाल्याचा आनंद झाला आहे. दिवसातून दोन वेळा आम्ही व्हिडीओ कॉलवर बोलतो. फिजीओथेरेपीचे डॉक्टर्स तिला रोज दोन वेळ चालण्यास सांगतात. तिची प्रकृती चांगली आहे. तिने लवकर या सर्व परिस्थितीवर मात केल्यामुळे डॉक्टर्स ही तिचं कौतुक करतात. ती लवकरच सामान्य आयुष्य जगेल याचा आनंद आहे. 

- कविता मोरे, मोनिकाची आई

हात प्रत्यारोपणासाठी अल्प प्रतिसाद -

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात इतर अवयवांच्या तुलनेत हात प्रत्यारोपण आणि दान करण्याची  संख्या फारच नगण्य आहे. ब्रेनडेड अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीचे हात दान करण्यासाठी आजही लोक पुढाकार घेत नाहीत. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त दोनच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या गेल्या. त्यातील 2018 साली पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये एका जवानावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण, काही कारणांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली  नाही. आणि आता 2020 मध्ये मुंबईतील मोनिका मोरे हिच्यावर हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली गेली अशी माहिती रिजनल ऑर्गन अँड टीशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (रोटो) प्रमख डॉ. अ‍ॅस्ट्रिड लोबो गाजीवाला यांनी दिली आहे.

monica more responding to the treatment after hand transplant

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com