Mumbai Monorail: प्रवाशांची प्रतीक्षा संपणार! मोनोरेल पुन्हा सेवेत उतरणार, कधीपासून होणार सुरु? महत्त्वाची माहिती समोर

Monorail Service Update: मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली मोनोरेल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
Mumbai Monorail

Mumbai Monorail

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली मोनोरेल पुन्हा एकदा नव्या दमात, नव्या ढंगात सेवेत येणार आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे अडखळणाऱ्या मोनोरेलसाठी नवीन रोलिंग स्टॉक आणि सीबीटीसी-आधारित सिग्नलिंग प्रणाली उभारली असून, त्याबाबतचे स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता प्रमाणपत्र (आयएसए) मिळाले आहे. हे प्रमाणपत्र ब्यूरो व्हेरिटास’ या जागतिक स्तरावरील चाचणी आणि तपासणी प्रमाणीकरण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेकडून हे देण्यात आले आहे. त्यामुळे मोनोरेल लवकरच सेवेत दाखल करणे शक्य होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com