Fishermen Crisis
Sakal
मुंबई
Fishermen Crisis : मासेमारीच्या नव्या हंगामाला खराब हवामानाचा फटका; कोळी युवाशक्ती संघटनेची सानुग्रह अनुदानाची मागणी
Monsoon Damage : मासेमारी बंदीनंतर हंगाम सुरू होताच अतिवृष्टी आणि वादळामुळे मच्छिमारांना मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कोळी युवाशक्ती संघटनेने मुख्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करण्याची मागणी केली आहे.
विरार : पावसाळी मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या हंगामाला अतिवृष्टी, वादळी वारे यांचा जबरदस्त फटका बसला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच पारंपरिक मच्छिमारांना अनपेक्षित नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागल्याने ऑगस्ट-सप्टेंबर हे मासेमारीकरिता पोषक महिने असूनही खराब हवामानामुळे या दोन महिन्यांत पारंपरिक मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. परिणामी, मच्छिमारांचे आर्थिक गणित कोलमडले असून मच्छिमारांना शासनाने सानुग्रह अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.