esakal | उपनगरी लोकल प्रवास बंदी घालणाऱ्या सरकारला धडा शिकवणार - केशव उपाध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Keshav Upadhye

उपनगरी लोकल प्रवास बंदी घालणाऱ्या सरकारला धडा शिकवणार - केशव उपाध्ये

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : मुंबईतील (Mumbai) सर्वसामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी लोकल (Suburban Railway) प्रवासास बंदी घालणाऱ्या (Mumbai train issue) सरकारला (Government) धडा शिकविण्यासाठी मुंबईकर 2 ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु करतील, असा इशारा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी दिला. ( Mumbai train travelling issue travelers will break the rules and travele-nss910)

हेही वाचा: प्रवाशांच्या संकटकाळात 'लालपरी' धावली, पहाटे चार वाजता 'ST' चे मदतकार्य

गुरुवारी, (ता.22) रोजी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात उपाध्ये म्हणाले की, मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत सरकारकडे धोरण नसल्याने सामान्य माणसाचे अतोनात हाल होत आहेत. सामान्य माणसाला उपनगरी प्रवासास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वे प्रवासास परवानगी देण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. टाळेबंदी बाबतच्या राज्य सरकारच्या धरसोडपणामुळे जनतेचे जगणे अगोदरच कठीण झाले आहे.सामान्य माणसाला लोकल प्रवासास परवानगी द्या, अन्यथा प्रवास खर्चापोटी पाच हजार रु. भत्ता द्या, या भाजपाने केलेल्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले. वैतागलेला सर्वसामान्य माणूस आघाडी सरकारच्या निषेधार्थ मोफत लोकल प्रवास करून सविनय नियमभंग आंदोलन करेल, असा इशारा उपाध्ये यांनी दिला.

loading image