
वाशी (बातमीदार) : नवी मुंबईत रविवारी रात्रीपासून जोरदार हजेरी लावलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे-बेलापूर मार्गासह, सायन-पनवेल महामार्ग, एमआयडीसीतील रस्ते जलयम झाले. मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेंग मंदावला होता. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी देखील झाली होती.