
मुंबई- सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. 1 जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरित भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं. मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या सर्वसाधारण वेळापत्रकात बदल होत असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. दरम्यान दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यावर्षी मात्र लांबणीवर गेला आहे. दक्षिण भारतातून मान्सून उत्तरेकडे येत असतो. यंदा मान्सून 1 जून ऐवजी 5 जूनला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा मान्सून 4 दिवस उशिरानं एन्ट्री येणार आहे.
केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं. यावेळी हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात काही बदल झालेत. यंदा मान्सून 1 जूनलाच दाखल होणार असून यात कोणाताही बदल नसेल असं म्हटलं होतं. पण आता वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून 4 दिवसानं लांबणीवर गेला आहे.
दिल्लीमध्ये मान्सून 23 जून ऐवजी 27 जूनला दाखल होईल तर मुंबईमध्ये 10 जून ऐवजी 11 ला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर यंदाचा मान्सून 29 सप्टेंबर ऐवजी 8 ऑक्टोबरपर्यंत असेल असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात होता. पण आता तो पुढे जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून पाऊस सामान्य होईल. त्यानुसार 2020 मध्ये मान्सून सरासरीच्या 100 टक्के म्हणजे चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
असा असेल यंदाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
गेल्या वर्षी केरळमध्ये 6 जूनला मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज होता मात्र 8 जूनपर्यंत 2 दिवस उशिरा दाखल झाला होता. यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.
भारतात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परततो. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता 21 टक्के आहे तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 20 टक्के आहे. मान्सून 1 जूनच्या आसपास केरळच्या तिरुअनंतपूरममधून आगमन करेल, असाही अंदाज IMD ने आधीच वर्तवला आहे. मात्र यामध्ये 3 ते 7 दिवस पुढे-मागे होऊ शकतात, असेही संकेत आहेत.
monsoon will be delayed by 5th june read full news when monsoon will hit india
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.