सावध व्हा ! कोरोनानंतर मुलांना होतोय 'कावासाकी' आजार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

अतिसार, उलट्या होणं, श्वास घेण्यात अडचण येते, त्वचेचा रंग बदलणे, छातीत दुखणं आणि थकवा या आजाराची इतर लक्षणं आहेत.

मुंबई - सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा लढा देत आहेत. या दरम्यान आता अनेक देशात विविध आजार उद्भवत असल्याचं चित्र आहे. त्यातच आता लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसची वेगळी लक्षणं दिसू लागलीत. त्यातच आता कोरोनानंतर एका अज्ञात आजारानंही या चिमुरड्यांना विळखा घातला आहे. अमेरिकेत शंभरपेक्षा अधिक लहान मुलांना या अज्ञात आजाराची लागण झाली आहे, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतल्या 17 राज्यांमध्ये 164 मुलांना याची लागण झाल्याचं समजतंय. 

अतिसार, उलट्या होणं, श्वास घेण्यात अडचण येते, त्वचेचा रंग बदलणे, छातीत दुखणं आणि थकवा या आजाराची इतर लक्षणं आहेत. कावासाकी हा एक रहस्यमय रोग आहे. अमेरिकेत काही मुलं कोविड 19 पॉझिटिव्हही आढळलीत. 

न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत बालरोग दाहक सिंड्रोमची 102 प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर 5 ते 9 वयोगटातील आणि 10 ते 14 वयोगटातील 28 टक्के मुलांमध्ये 29% प्रकरणे नोंदवली गेल्याची माहिती समजतंय. सध्या हा सिंड्रोम अमेरिकेतील मुलांमध्ये दिसून येत आहे, जो मागच्या महिन्यात युरोपमध्ये आढळून आला होता. या सिंड्रोमचा परिणाम यूके, स्पेन आणि आता इटलीसह इतर देशांमधील लहान मुलांवरही परिणाम होत आहे. 

मोठी बातमी - कोरोना विरुद्धची लढाई लवकरच संपणार, मात्र 'अशी' येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट

ICU मध्ये दाखल असलेल्या मुलांमध्ये अशी कित्येक प्रकरणं आहेत, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाला सूज, उलटी आणि डायरिया अशी लक्षणंही समोर आलीत. अशी लक्षणं दिसणाऱ्या मुलांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती, त्यांना थेट ICU मध्येच दाखल करावं लागलं. या सर्वांच्या कोरोना टेस्टही करण्यात आले, त्यापैकी काही मुलं कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसने (NHS)दिली आहे. 

डॉक्टरांच्या मते, सर्व वयाच्या लहान मुलांमध्ये अशी लक्षणं दिसू लागलीत. गेले 3 आठवड्याभरापासून अशी प्रकरणं दिसून येत आहेत. NHS शी संबंधित डॉक्टरांनी याला सध्या इन्फ्लेमेट्री सिंड्रोम म्हटलं असून याचा संबंध कोरोना व्हायरसशी असू शकतो, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

कावासाकी आजाराची लक्षणं? 

ज्या मुलांना हा आजार झाला आहे, ते सर्वजण 2 ते 15 वयोगटातील आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्वचा आणि नसांना सूज ही सुरुवातीची लक्षणं आहेत. मुलांच्या डोळ्यांमध्ये जळजळ जाणवते, शरीरावर लाल चट्टे येतात. शिवाय त्वचेचा रंगही बदलो. भरपूर दिवस ताप, पोट आणि छातीत गंभीर वेदना, ब्लड प्रेशर कमी होतं या समस्या मुलांमध्ये दिसून येतात.

सुरुवातीला हा आजार कोरोनासंबंधित असल्याचं मानलं जात होतं. मात्र न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्रयू क्योमो यांनी सांगितलं की, या अज्ञात आजारानं ग्रस्त असलेल्या बहुतेक मुलांना श्वसनसंबंधी समस्या असल्याची लक्षणं नाहीत. न्यूयॉर्क जीनोम सेंटर आणि रॉकफेलर युनिव्हर्सिटी एकत्रितरित्या या आजाराचं कारण शोधण्याचं प्रयत्न करत असल्याचं क्योमो यांनी याआधीच म्हटलं आहे. 

महाविकास आघाडीच्या बैठकीत 'मोठा' निर्णय; 'या' तारखेपर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊन वाढवणार - सूत्रांची माहिती
 

काही मुलं व्हेंटीलेटरवर, प्रकृती चिंताजनक

या आजाराने ग्रस्त असलेल्या काही मुलांना श्वसनास त्रास होत असल्याने, त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलंय. मुलांमध्ये कोरोना आणि कावासाकीशी मिळतीजुळती लक्षणं आहे, जे असामान्य आहे आणि त्याची तपासणी सुरू आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. जोपर्यंत यामागील नेमकं कारण समजत नाही, तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं योग्य नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

कावासाकी आजार म्हणजे काय?

मुळात 1960 च्या दशकात जपानमध्ये पाळल्या गेलेल्या, कावासाकी रोग हा उच्च पातळीच्या जळजळांमुळे होतो आणि शरीरातील इतर ठिकाणी रक्तवाहिन्या आणि हृदयात त्रास होतो आणि कधीकधी त्वरित विषारी शॉक सिंड्रोम आणि मृत्यू देखील होतो. शरीरातील इतर ठिकाणी शॉक सिंड्रोम दर्शवतो मृत्यू सूचित करतो.

6 महिने ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांवर परिणाम करणाऱ्या या कावासाकी डिसीजला अमेरिकेत दुर्मिळ समजले जाते. याच्या सुरुवातीला ताप आणि चक्कर येते. परंतू, यावर उपचार न केल्यास गंभीर ह्रदयसंबंधी रोग होऊ शकतो.

या आजाराच्या लक्षणांमध्ये सतत उच्च ताप, त्वचेवर पुरळ उठणं, लाल डोळा, सुजलेले हात पाय आणि ओठांना भेगा पडू शकतात.

या आजारात शरीराच्या आतील अवयवांना सूज येते आणि कोरोनाच्या लक्षणाप्रमाणे ताप येतो, श्वास घेण्यात समस्या येते.

'ई- पास' साठी पोलिसांची अशी आहे नियमावली, जाणून घ्या

ब्रिटनमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. एलिजाबेथ यांनी सांगितलं की, अशीच प्रकरणं इटली, स्पेनसारख्या देशांमध्येही आढळली आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला होता. मात्र त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं डायरिया, पोटदुखी ही देखील कोरोनाची लक्षणं आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: multisymptom inflammatory kawasaki is pediatric disease read full story