मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी, 'या' यादीत मिळवलं 'टॉप 5' मध्ये स्थान...

सुमित बागुल
Saturday, 8 August 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान पटकावलं आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी कशी भूमिका निभावली याबद्दल एक महत्त्वाचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ वा क्रमांक पटकावलाय. महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर प्रदेशाचे मुख्यामंत्री, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. 

कार्वी इनसाइट्स आणि इंडिया टुडे या संस्थांमार्फत 'मूड ऑफ द नेशन' नामक सर्व्हे करण्यात येतो. अशाप्रकारचा सर्व्हे या आधीही झाला होता. यावेळच्या सर्व्हेत १५ ते २७ जुलैदरम्यान हे सर्व्हेक्षण पार पडलं. ज्यामध्ये देशभरातील नागरिकांना कोरोना परिस्थितीमध्ये विविध राज्यातील सरकारं कशा प्रकारे कामं करतायत याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. खरंतर या आधी देखील असाच एक सर्व्हे घेण्यात आलेला. तेंव्हाही नागरिकांनी उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात चांगली मतं टाकली होती. 

अत्यंत महत्त्वाची बातमी - मुलांच्या हातात मोबाईल किंवा टॅब देणाऱ्या पालकांनो 'ही' बातमी वाचा, जाणून घ्या महाभयंकर 'अम्ब्लोपिया' बद्दल

एक नजर टाकुयात देशातील टॉप ५ मुख्यमंत्रयंवर  

नंबर १ : योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश) - २४ टक्के
नंबर २ : अरविंद केजरीवाल (दिल्ली) - १५ टक्के
नंबर ३ : जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश ) - ११ टक्के
नंबर ४ :  ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) - ९ टक्के
नंबर ५ :  उद्धव ठाकरे व नितीश कुमार - ७ टक्के

गेल्या सर्व्हेक्षणाच्या तुलनेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान या सर्व्हेक्षणात ममता दीदी आणि नितीश कुमार यांची लोकप्रियता मात्र कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. 

mood of nation survey uddhav thackeray in top five with seven percent votes


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mood of nation survey uddhav thackeray in top five with seven percent votes