मोरबे धरण येत्या आठवड्यात १००% भरणार; पाणी पातळीत वाढ

morabe dam
morabe damsakal media
Updated on

सानपाडा : नवी मुंबई (navi mumbai) शहराला पाणी पुरवठा (water supply) करणाऱ्या मोरबे धरण (morabe dam) परिसरात गेल्या आठवडाभरात मोठा पाऊस झाल्याने (heavy rainfall) धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन आठवड्यापूर्वी पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण ८५%वरून ९४.८३% इतके भरले आहे. मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ८८ मीटर इतकी असून आता धरणाची पाण्याची पातळी ८६.९७ मीटर इतकी (water level increases) झाली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात आणखी सरासरी ४००मिमी पाऊसाची आवश्यकता असून येत्या आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज करण्यात येत आहे.

morabe dam
अकरावी प्रवेशात अनागोंदी कारभार; विशेष फेरीनंतरही प्रक्रिया सुरू ठेवणार

नवी मुंबई महानगर पालिका हद्दीत आणि सिडकोच्या कलंबोळी कामोठे या काही भागात मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो . हि पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज ४३० एम एल डी पाणी पुरवठा करावा लागतो. नवी मुंबई महापालिकेकडे स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यावर हे धरण पूर्ण क्षमतेने भरते. मात्र मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने धरण ९५% भरले होते. परंतु धरण क्षेत्रात नवी मुंबई शहराच्या तुलनेत कमी पाऊस पडत आहे,तरीही यंदा हे धरण १००% भरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. धरण क्षेत्रात ३०मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ३४७०.६० मिलिमीटर पाऊस पडला आहे. आणखीन सरासरी ४०० मिमी पावसाची आवश्यकता असून पावसाचा जोर कायम राहिला तर येत्या आठवड्याभरात हे धरण पूर्ण भरेल अशी शक्यता वर्तविण्यात येत असून महापालिकेतर्फे जलपूजनाच्या तयारीला देखील सुरुवात करण्यात येत आहे .तर मागील वर्षी २०२० मध्ये धरण पूर्ण न भरल्याने जलपुजनाचा मुहुर्त हुकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com