esakal | मोरबे धरण ओव्हरफ्लो; धरणातील सध्याची पाण्याची पातळी ८८ मीटर Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मोरबे धरण ओव्हरफ्लो; धरणातील सध्याची पाण्याची पातळी ८८ मीटर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुर्भे : नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे महापालिकेचे मोरबे धरण मंगळवारी ओव्हर फ्लो झाले आहे. धरणातील सध्याची पाण्याची पातळी ८८ मीटर इतकी असून धरणाचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. यंदाही मोरबे धरण भरेल की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र पावसाने (Rain) गेल्या काही दिवसांत जोरदार हजेरी लावल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. हा पाणीसाठा २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत पुरणार आहे. धरण भरल्यामुळे नवी मुंबईकरांची (Mumbai) वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

जलपूजनाची होणार हॅट्रिक मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येते. २०१३ मध्ये धरण भरले होते त्यानंतर तीनवर्षे पाऊस कमी झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. परंतु गेल्या तीन वर्षांपासून धरण क्षेत्रात होणार्‌या दमदार पावसामुळे धरण पूर्णपणे भरत असून यंदा जलपूजनाची हॅट्रिक होणार आहे.

मोरबे धरणात आजच्या घडीला १९०.८९० दशलक्ष घनमीटर म्हणजे १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीत आणि सिडकोच्या कळंबोली, कामोठेच्या काही भागांत मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबई आणि परिसरासाठी दिवसाला ४७० एमएलडी पाण्याचा वापर केला जातो. २०१७ ते २०१९ अशी सलग तीन वर्ष पूर्ण क्षमतेने भरणारे हे धरण मागच्या पावसाळ्यात २०२० मध्ये मात्र पूर्ण भरले नव्हते. आता मात्र धरण भरल्यामुळे नवी मुंबईकरांची ही चिंता मिटली आहे.

हेही वाचा: मुंबई : बिबट्याचा मानवी वस्तीत वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण पूर्ण भरले आहे. त्‍यामुळे शहरवासियांची पाण्याची चिंता मिटली आहे.

- मनोहर सोनवणे (कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा, नवी मुंबई महापालिका0

पाण्याची पातळ

धरणाची क्षमता ८८ मीटर

सध्याची पातळी ८८.९७ मीटर

२३ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या काळात ३ सें.मी. ने पाणी साठा कमी झाला. (नियमित पाणी पुरवठ्‌यामुळे)

धरणक्षेत्रातील पावसाचे एकूण प्रमाण ३ हजार ७४२ मि.मि.

loading image
go to top