

Morbe Dam
ESakal
तुर्भे : मोरबे धरणातील गेली २५ वर्षे गाळ काढण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. नॅटकनेक्ट फाउंडेशनने ही माहिती आरटीआयखाली मागवली होती. त्यावर महापालिकेने उत्तर दिले आहे. या पार्श्वभूमीवर साचलेल्या गाळाचे शास्त्रीय सर्वेक्षण करून तो काढण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्याची मागणी 'नॅटकनेक्ट फाउंडेशन'ने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.