पावसामुळे ट्रेनमध्ये अडकलेल्या तब्बल २०० पेक्षा अधिकांची RPF आणि NDRF कडून सुटका

प्रशांत कांबळे
Wednesday, 5 August 2020

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतला जाणाऱ्या पहिल्या ट्रेनमधून सुमारे 160 प्रवाशांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले.

मुंबई : मुंबईत मंगळवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामूळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दरम्यान दुपारपासूनच मस्जिद रोड ते भायखळा दरम्यान रुळावर पाणी साचल्याने दोन लोकल ट्रेन अडकल्या होत्या दरम्यान, त्यातील सुमारे 200 अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना CSMT आरपीएफ टीम, वाडीबंदर आरपीएफ टीम, NDRF आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर सुरक्षीत बाहेर काढण्यात आलंय. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतला जाणाऱ्या पहिल्या ट्रेनमधून सुमारे 160 प्रवाशांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येत असलेली लोकलसुद्धा मस्जित बंदर येथे अडकली होती. दरम्यान त्यामधून सुमारे 75 प्रवाशांना बाहेर सुरक्षीत काढण्यात आले आहे. 

हेही वाचा : सर्वात मोठी बातमी : मुंबई हाय अलर्टवर, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला तातडीचा आढावा

यामध्ये सिएसएमटी आरपीएस पोलिस निरीक्षक संदीप किरीटकर आणि वाडीबंदर आरपीएफ पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे यांची टीम आणि स्थानिक नागरिक आणि एनडीआरएफच्या टीमने ही कामगीरी बजावली. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने अडकलेल्या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. तात्पुरत्या निवाऱ्यात आता या प्रवाशांना सोडण्यात आले आल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए के जैन यांनी सांगितले.

( संकलन - सुमित बागुल )

more than 200 local train travellers rescued from masjid railway station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than 200 local train travellers rescued from masjid railway station