सर्वात मोठी बातमी : मुंबई हाय अलर्टवर, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला तातडीचा आढावा

संजय मिस्कीन / सुमित बागुल
Wednesday, 5 August 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या. कालपासून मुंबई आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले.

दरम्यान उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असा भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलिस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत. 

मोठी बातमी - शंभर वर्षात पाहिल्यांदाच असं घडलं , जे.जे. रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी; रुग्णांसह नातेवाईकांची तारांबळ... 

 

मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे. 

 

हेही वाचा : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

 

दम्यान मुंबईत कोसळणाऱ्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेकडून तात्पुरती राहण्याची सोय म्हणजेच टेम्पररी शेल्टर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ल्यात शाळांमध्ये अशा प्रकारची राहण्याची सोय करण्यात आली आहे. पावसामुळे असुरक्षित झालेल्या भागांमधील नागरिकांना टेम्पररी शेल्टर्समध्ये हलवण्यात येतंय. बृहन्मुंबई महापालिकेने याबाबत ट्विटरवरून माहिती दिलीये.  

( संकलन -सुमित बागुल ) 

CM uddhav thackeray reviewed the situation ofmumbai and districts experiencing heavy rainfall


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM uddhav thackeray reviewed the situation of mumbai and districts experiencing heavy rainfall