मुंबईत 70 टक्के कॉन्टॅक्ट 'हाय रिस्क', पालिकेकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत 70 टक्के कॉन्टॅक्ट 'हाय रिस्क', पालिकेकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर

मुंबईत हाताबाहेर गेलेला कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येत आहे.

मुंबईत 70 टक्के कॉन्टॅक्ट 'हाय रिस्क', पालिकेकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर

मुंबई:  मुंबईत हाताबाहेर गेलेला कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 40 हजारांहून अधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले गेले. त्यातील 70 टक्के कॉन्टॅक्ट 'हाय रिस्क' असल्याचे समोर आले आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली असून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. पूर्वी एका घरातील एखादा व्यक्तीबाधित होत होता. आता मात्र संपूर्ण कुटुंबबाधित होत असल्याचे दिसते. यामुळे पालिकेनं बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यावर अधिक भर दिला आहे. 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी पालिकेनं विशेष पथकं नेमली आहेत. त्यांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जातं आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 41,702 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. त्यातील 28,621 (69%) हाय रिस्क कॉन्टॅक्ट होते तर 13,081 (31 %) लो रिस्क कॉन्टॅक्टचा समावेश होता. 

मुंबईत आतापर्यंत 52,76,239 कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यात आले. त्यात 25,43,421(48 %) हाय रिस्क कॉन्टॅक्ट तर 27,32,818 (52%)लो रिस्क कॉन्टॅक्ट चा समावेश आहे. त्यात 4,09,320 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. 

मुंबई विभागातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
मुंबईत 48,46,643 व्यक्तींनी आपले क्वारंटाईन पूर्ण केले आहे. 4,28,608 व्यक्ती आज ही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 988 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असून आतापर्यंत 1,60,750 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले.
 
एका बाधित रुग्णाकडून सुमारे 400 व्यक्तींना बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याचे राज्य टास्क फोर्सने सांगितले आहे. यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण कुटुंब बाधित होत असल्याचे दिसते. यामुळे मास्क, हाताची स्वछता आणि सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे राज्य टास्क फोर्सने म्हटले आहे.

हेही वाचा- Mukesh Ambani: स्फोटक प्रकरणाचा खरा सूत्रधार सचिन वाझेचं- NIA

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

More than 40 thousand contact traces done daily Mumbai high risk

Web Title: More 40 Thousand Contact Traces Done Daily Mumbai High Risk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..