शहरात 'इतके' लाख नागरीक आजही आहेत प्रतिबंधीत क्षेत्रात, नागरिकांनो कोरोनाबाबत हलगर्जीपणा नकोच

समीर सुर्वे
Thursday, 30 July 2020

मुंबईतील प्रतिबंधीत क्षेत्रात 50 लाखाहून अधिक नागरीक आहेत. यात 40 लाख 6 हजार नागरीक प्रतिबंधीत वस्त्या आणि 9 लाख 2 हजार नागरीक सिल इमारतींमध्ये राहात आहेत.

मुंबई : मुंबईतील प्रतिबंधीत क्षेत्रात 50 लाखाहून अधिक नागरीक आहेत. यात 40 लाख 6 हजार नागरीक प्रतिबंधीत वस्त्या आणि 9 लाख 2 हजार नागरीक सिल इमारतींमध्ये राहात आहेत. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 28 जुलैला 5 हजार 690 इमारती सिल होत्या तर 622 चाळी आणि वस्त्या प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या.

24 जुलै रोजी 6 हजार 169 इमारती सिल होत्या तर 631 वस्त्या प्रतिबंधीत होत्या. यामध्ये अंधेरी आणि जोगेश्‍वरी पुर्व, के पुर्व विभागात प्रतिबंधीत क्षेत्रात येणारी सर्वाधिक लोकसंख्या होती. या भागात 6 लाख 46 हजार नागरीक प्रतिबंधीत क्षेत्र आणि सिल केलेल्या  इमारतीत राहात आहेत. याच प्रभागात मुंबईतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 29 जुलै पर्यंत या प्रभागात 7 हजार 209 रुग्ण आढळले असून त्यापैकी 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 520 रुग्णांनी कोविडवर मात केली आहे.

मोठी बातमी - सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचे नवी मुंबई कनेक्शन; रिया चक्रवर्तीच्या वडिलांच्या नावावर घर

सर्वाधिक सिल इमारतींची संख्या गोरेगाव 'पी दक्षिण' प्रभागात आहे. या प्रभागात 62 हजार घरं सिल इमारतीत असून त्यात 2 लाख 18 हजार नागरीक राहात आहेत. तर, प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्वाधिक लोकसंख्या ही मालाड पी उत्तर विभागात आहे. या विभागातील 1 लाख 36 हजार घरं प्रतिबंधीत क्षेत्रात असून त्यात 6 लाख 59 हजार नागरीक आहेत.

29 जुलै पर्यत पी उत्तर प्रभागात 6 हजार 758 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 295 रुग्णांचा मृत्यू झाला असून 5 हजार 491 रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. या प्रभागात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. 

more than fifty lakh citizens are in contentment zone in one mumbai city


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than fifty lakh citizens are in contentment zone in one mumbai city