सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचे नवी मुंबई कनेक्शन; रिया चक्रवर्तीच्या वडिलांच्या नावावर घर

सुजित गायकवाड
Thursday, 30 July 2020

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी बिहार राज्यात पटना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर आता नवीन मुद्दे समोर आले आहेत.

नवी मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी बिहार राज्यात पटना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर आता नवीन मुद्दे समोर आले आहेत. सुशांत डायरेक्टर असलेल्या दोन कंपन्यांचे पत्ते नवी मुंबईत सापडले आहेत. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्यचे धागेदोरे नवी मुंबईत जोडले असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. 

रिया चक्रवर्तीला मुंबई पोलिसांमधीलंच कुणीतरी मदत करतंय - 

सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला आता एक महिना होत आल्यानंतरही पोलीस महत्वाच्या निष्कर्ष पर्यंत पोहचलेले नाहीत. त्याच दरम्यान सुशांतच्या वडिलांनी पटना पोलिसांमध्ये रिया चकरवर्तीच्या विरोधात दाखल केलक्या तक्रारींमुळे आणखीन पेच वाढला आहे. परंतु त्यांनी पोलिसांकडे तक्रार देताना काही महत्वाची कागदपत्रे सादर केली आहेत. या कागदपत्रांमध्ये सुशांतसह रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोवीक चक्रवर्ती डायरेक्टर असलेल्या कंपन्यांचे कागदपत्रे सुशांतच्या वडिलांनी पोलिसांना सादर केली आहेत.

सुशांत सिंह आत्महत्या तपास मुंबई पोलिसांकडेच; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

विविदराग रियालिटीएक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि फ्रॉन्ट इंडिया वर्ल्ड फाउंडेशन या दोन कंपन्यांवर सुशांतसह रिया आणि तिचा भाऊ डायरेक्टर असल्याचे दिसून येत आहे. या कंपनीचे पत्ते नवी मुंबईतील उलवे सेक्टर 8 येथील परडाईझ ग्रुपच्या साई फॉर्च्युन इमारतींमधील एका घराचा पत्ता असल्याची बाब समोर आली आहे. परंतु हे घर रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्या नावावर असल्याचे समजले आहे. परंतु या प्रकरणी अधिक चौकशी केली आता या घरात सुशांत, रिया आणि तिचे वडील इंद्रजित कधीच राहायला आले नसल्याचे समजते आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा पोलीस तपासात बॉलिवूडमधील अनेक नामांकित चेहऱ्यांची जबानी नोंदवण्याचे काम सुरू असताना अचानक या दोन कंपन्यांच्या नावावरील मालमत्ता समोर आल्याने हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर आले आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai connection of Sushant Singh Rajput case; House named after Riya Chakrabortys father