

Containers Stuck at JNPA
ESakal
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक सागरी वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली आहे. मालवाहू जहाजांना सुरक्षित प्रवासासाठी मोठा वळसा घालावा लागत असल्याने प्रवासाचा कालावधी १० ते १४ दिवसांनी वाढला आहे. परिणामी जेएनपीएच्या खासगी बंदरात तब्बल एक लाख १६ हजार १५९ कंटेनर अडकले आहेत. एकट्या बीएमसीटी बंदरात ४२ हजार ९७४ कंटेनर अडकले आहेत. युद्धाचा परिणाम दीर्घकाळ राहिल्यास भारताच्या एकूण निर्यातीला सुमारे ८ ते १० अब्ज डॉलर्सचा फटका बसू शकतो, अशी भीती जाणकारांनी वर्तविली आहे.