esakal | कोब्रा सापाबरोबर खेळ, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करणं सर्पमित्राला पडलं महाग
sakal

बोलून बातमी शोधा

कोब्रा सापाबरोबर खेळ, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करणं सर्पमित्राला पडलं  महाग

कोब्रा सापाबरोबर खेळ, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करणं सर्पमित्राला पडलं महाग

sakal_logo
By
नरेश जाधव

ठाणे: इंडियन कोब्रा (cobra snake) जातीच्या सापाशी खेळताना, त्याचे व्हिडियो बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करणाऱ्या खर्डी येथील सर्पमित्राला खर्डी (Khardi) वन्यजीव विभागाचे वनधिकारी दर्शन ठाकूर यांनी वन्यजीव विभागाच्या टीमच्या (forest dept team) सहाय्याने अटक केली. सर्पमित्राने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चा भंग केला होता. खर्डी येथील सर्पमित्र आकाश वाटाणे (akash watane) वय (22) याच्याबद्दल 15 जुलै रोजी दर्शन ठाकूर यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर खर्डी वन्यजीव विभागाने त्याला ताब्यात घेतले होते. (The man arrested from khardi who uploaded snake video on instagram dmp82)

आकाशने त्याने पकडलेल्या सापांशी खेळताना, हाताळताना व सापाला व स्वत:ला इजा होईल, असे प्रकार करताना मोबाइल वर चित्रीकरण केले. इन्स्टाग्रामवर त्याने तीन-चार व्हिडियो व्हायरल केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

हेही वाचा: पुतण्यावर बलात्काराचा आरोप, काका किशनकुमार यांनी केला खंडणीचा आरोप

ठाण्याचे उपवनसरक्षक भानुदास पिंगळे,सहायक उपवनसरक्षक दीपक मते यांच्या मार्गदर्शनात खर्डीचे वन्यजीव अधिकारी दर्शन ठाकुर,नंदकिशोर सोनावणे,गणेश भांगरे,जगन राठोड, मछिन्द्र आघाव,विनोद लबडे,पंढरीनाथ नागारगोजे व प्रिया वरकुटे आदि कर्मचाऱ्यांनी आरोपीला शोधण्यासाठी प्रयत्न केले.

हेही वाचा: राज ठाकरे नाशिकमध्ये, अमित ठाकरेंकडे येऊ शकते मोठी जबाबदारी

ग्रामीण भागातील सर्पमित्र व सर्वसामान्य नागरिकांना वन्यजीवाबबत असलेले गैरसमज व वन्यजीव वाचविण्यासाठी लवकरच मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे खर्डीचे वन्यजीव अधिकारी दर्शन ठाकुर यांनी यावेळी सांगितले.

loading image