आठवडाभरात ४ हजाराहून अधिक रुग्णालयातील ऑक्सिजन युनिटचे ऑडिट पूर्ण

आयटीआयच्या तज्ञ टीमचे कोविड रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण
आठवडाभरात ४ हजाराहून अधिक रुग्णालयातील ऑक्सिजन युनिटचे ऑडिट पूर्ण

मुंबई: मागील महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या एका रुग्णालयातील दुर्घटनेनंतर आयटीआय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकीच्या तज्ञ, शिक्षक, प्राचार्यांनी तब्बल 4 हजारांहून अधिक रुग्णालयातील ऑक्सीजन वायुनालिका, त्यासाठी असलेल्या प्रणालीचे तसेच युनिटचे निरीक्षण करून त्याचे ऑडिट (oxygen unit audit) करण्याचे काम पूर्ण केले आहे. यामुळे येत्या काळात राज्यात ऑक्सीजन ऑक्सीजन वायुनालिका, त्यासाठी असलेल्या प्रणालीमुळे होणाऱ्या दुर्घटनेला पायबंद घालण्यास मोठी मदत मिळणार आहे. (More than four thousand hospitals oxygen unit audit completed)

मागील महिन्यात नाशिक मधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने 22 हून अधिक रुग्णांना आपला जीव गमावावा लागला होता, त्याच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयाचे ऑक्सिजन प्लांट आणि असलेल्या युनिटचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील (आयटीआय)तसेच पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगमधील तज्ञ शिक्षक, प्राचार्य, अधिकारी आदींवर हे ऑडिट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यात सर्वाधिक आयटीआय मधील तज्ञांनी कोरोना आणि त्याचा संसर्ग असलेल्या ऑक्सिजन प्लांट,आणि सुरू असलेल्या युनिटमध्ये प्रत्यक्षात जाऊन हे ऑडिट केले आहे.

आठवडाभरात ४ हजाराहून अधिक रुग्णालयातील ऑक्सिजन युनिटचे ऑडिट पूर्ण
पुढच्यावर्षी BMC निवडणूक वेळेवर झाली नाही, तर...

यामध्ये ऑक्सिजन प्लांट, युनिट च सध्याची स्थिती, कार्यरत असलेल्या यंत्रणा, तसेच कालबाह्य झालेले तंत्रज्ञान आदींची एकूण एक माहिती गोळा करून त्यासाठीचे ऑडिट पूर्ण केले आहे. त्यासाठीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

आठवडाभरात ४ हजाराहून अधिक रुग्णालयातील ऑक्सिजन युनिटचे ऑडिट पूर्ण
मुंबईत परदेशी शिक्षणासाठी जाणार्‍या मुलांसाठी वॉक-इन लसीकरण

नाशिकमध्ये 600 रुग्णालयाचे ऑडिट..

नाशिक मधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने झालेल्या दुर्घटनेमुळे देशभरात चर्चा झाली होती. यामुळे नाशिक जिल्ह्यात एकूण 289 रुग्णालयाचे ऑडिट करण्यात आले तर संपूर्ण नाशिक विभागातून 600 हून अधिक रुग्णालयात अधिकारी, तज्ञ यांनी जाऊन त्या ठिकाणी ऑडिट करण्याचे काम पूर्ण केले आहे.

ऑडिटसाठी ऑनलाईन प्रशिक्षण...

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी, खाजगी रुग्णालयाची संख्या लक्षात घेऊन त्यासाठी अत्यंत सूक्ष्म असे नियोजन कटणायात आले होते. आयटी आतमधील तांत्रिक ज्ञान असलेले उपलब्ध अधिकारी/ कर्मचारी यांची खास टीम तयार करण्यात होती. या टीमकडून प्रत्येक जिल्ह्यातील तज्ज्ञांना त्यांना ऑडिट करणे आणि माहितीची नोंद करणे इत्यादी बाबींचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते.

अत्यंत विपरीत अशा परिस्थितीत राज्यातील सर्व आयटीआयने तयार केलेल्या तज्ज्ञांच्या टीमने कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. याच काळात कोविडची दुसरी लाट अक्षरशः थैमान घालत होती, त्यात आमच्या टीम मधील बरेच सदस्य बाधित होत होते, अनेकांना नंतर त्यांचा खूप त्रास सोसावा लागला. परंतु ऑडिट करण्याच्या कार्यवाहीत कोणताही खंड न पडू दिला नाही. आम्ही पर्यायी मनुष्यबळ आम्ही उपलब्ध केले. यामुळे आठवडाभरात हे ऑडिट करण्याचे उद्दिष्ट आम्हाला साध्य करता आले.

- दिगंबर दळवी, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com