Corona: मुंबईत एका दिवशी नव्या दहा हजार रुग्णांची भर | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update
Corona: मुंबईत एका दिवशी नव्या दहा हजार रुग्णांची भर

Corona: मुंबईत एका दिवशी नव्या दहा हजार रुग्णांची भर

मुंबई : मुंबईत आज 10,860 नवीन रुग्णांची (corona new patients) भर पडली. त्यापैकी 9665 (89 टक्के) रुग्ण एसिमटेमॅटिक (A symptomatic patients) आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे मुंबई पालिका प्रशासनाकडून (bmc authorities) सांगण्यात आले आहे. (More than ten thousand new corona patients found in mumbai)

हेही वाचा: केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन लावावं लागेल - पेडणेकर

आज सापडलेल्या रुग्णांपैकी 834 रुग्णांना (7.6 टक्के) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एकूण रुग्णांपैकी 4491 (0.5 टक्के) रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. आज सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी 52 रुग्णांना ऑक्सिजन बेड वर दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 1374 रुग्णांना ऑक्सिजन बेड वर उपचार करण्यात आले.

मुंबईत आतापर्यंत 8,18,462 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 5,40,147 (66 टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत. एकूण उपलब्ध रुग्णशय्यांपैकी 14.7 टक्के रुग्णशय्या भरल्या आहेत. आज 654 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत 7,52,012 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 47,476 सक्रिय रुग्ण आहेत. आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णांचा आकडा 16,381 वर पोहोचला आहे. आज 49,661 चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 1,38,64,594 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 92 टक्के आहे. कोरोना रुग्णवाढीचा वाढून 0.63 झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर ही 110 दिवसांपर्यंत खाली आला आहे.

सक्रिय कंटेंटमेंट झोन - 16

सक्रिय सीलबंद इमारती - 389

24 तासातील संपर्कांचा शोध - 31,015

कोविड काळजी केंद्रातील

अति जोखमीचे संपर्क - 542

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsCoronavirus
loading image
go to top