

3000 containers stuck at JNPA
Esakal
नितीन बिनेकर
मुंबई : पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांकडे होणारी निर्यात विस्कळित झाली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बाजारपेठांवर दिसत आहे. फळे, कांदा, साखर आणि भाजीपाला वेळेत पाठवता न आल्याने तो देशांतर्गत बाजारात येत असल्याने कृषी उत्पादनांच्या दरात घसरण झाली आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) बंदरातील कोंडी कमी करून निर्यात सुरळीत करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत.