मुंबईत कोरोना रूग्णवाढ सुरूच; परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जातेय का ?

मिलिंद तांबे
Monday, 14 September 2020

आज 2,256 नवीन रुग्णांची भर, तर 31 रुग्णांचा मृत्यू
 

मुंबई :  मुंबईत आजही कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला असून आज मुंबईत 2,256 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,71,949 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.24 टक्क्यांवर  स्थिर आहे. मुंबईत आज 31 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,178 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,431 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 31 मृत्यूंपैकी 24 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 18 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत पावलेल्या 31 रुग्णांपैकी तिघांचे वय 40 वर्षा खालील होते. तर 24 रुग्णांचं वय हे 60 वर्षांवर होतं. 4 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यानचे  होते.        

महत्त्वाची बातमी - आदित्य ठाकरेंचं उठणं-बसणं मुव्ही माफिया आणि सुशांतच्या खुन्यांसोबत, कंगनाने पहिल्यांदाच थेट नाव घेत केलं ट्विट

आज 1,431 रुग्ण बरे झाले असून यामुळे आजपर्यंत 1,32,349 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 56 दिवसांवर गेला आहे. तर 13 सप्टेंबरपर्यंत एकूण 9,25,148  कोविड चाचण्या करण्यात आल्या. मागील संपूर्ण आठवड्यात, म्हणजेच 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.24 वर स्थिर आहे. 

564 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

मुंबईत 564 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 8,637 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 13,953 अति जोखमीचे रुग्ण आहेत. 2,362 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

( संपादन - सुमित बागुल ) 

more than two thousand new corona patients detected from mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than two thousand new corona patients detected from mumbai