मधुमेह, स्वादुपिंड, लठ्ठपणा, उच्च रक्तदाबामुळे मुंबईत कोविड 19 चे अधिक बळी

मधुमेह, स्वादुपिंड, लठ्ठपणा, उच्च रक्तदाबामुळे मुंबईत कोविड 19 चे अधिक बळी

मुंबईः मधुमेह, स्वादुपिंड, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घ आजारांमुळे मुंबईत कोविड 19 चे सर्वाधिक बळी गेले आहेत. 85 टक्के मृतांमध्ये दीर्घकालीन आजारी असलेल्या 50 वर्षावरील व्यक्तींचा समावेश आहे. मात्र त्यांचे बाधित होण्याचे प्रमाण केवळ 44 टक्के असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे.

पालिकेने कोविडमुळे झालेल्या 9869 मृत्यूचे विश्लेषण केले. त्यानुसार सर्वसाधारण वयोगटातील रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे 18.3 तर 80 ते 89 वयोगटातील रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे 17.5 टक्के इतके आहे. मात्र दीर्घकालीन आजार असलेल्या रूग्णांमुळे शहरातील मृत्यूदर 4 ते 5 वेळा 4 टक्क्यांच्या वर राहिला आहे. 

वयोवृद्धांमधील मृत्यूचे प्रमाण हे कमी होताना दिसते. 70 ते 79 वयोगटातील रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे 13 टक्क्यांवरून 8.6 टक्क्यांपर्यंत खाली आले. मात्र 60 ते 60 वयोगटातील रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे सर्वाधिक असून आतापर्यंत 2,829 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

लहान मुलं तसेच किशोरवयीन मुलांचे वाधित होण्याचे प्रमाण काही हजारांवर गेले असले तरी त्यांचा मृत्यूदर हा केवळ 0.5 टक्के इतका असून 20 वर्षीय रूग्णांचे मृत्यू प्रमाण हे 0.5 पेक्षा ही कमी आहे. त्यामुळे वयोवृद्ध तसेच दीर्घकालीन आजार हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे मृत्यू नियंत्रण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांचे म्हणणे आहे. 

कोरोनामुळे ठराविक वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अनेक रूग्ण  उपचारासाठी उशिरा दाखल होत असल्याचे अधिक चिंताजनक असल्याचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. अनेक रूग्ण हे उशिरा दाखल होत असल्याने अनेक रूग्णांचा मृत्यू 24 ते 48 तासांत होत असल्याचंही ते पुढे म्हणाले. मात्र तरी देखील डॉक्टर अथक प्रयत्न करून रूग्णांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असून त्यामुळे गंभीर रूग्णांचा मृत्यूदरही 7 वरून 2 टक्क्यांवर आला आहे. 

मुंबईत दीर्घकालीन आजार आणि प्रदूषण यामुळे मृताचे प्रमाण वाढले. मुंबईत रूग्णांचा आकडा हा 2.69 लाखांवर पोहोचला आहे. तर बंगळूरूमध्ये 3.2 लाख रूग्ण असून मुंबईच्या त्या तुलनेत 3 टक्के मृत्यू झाले असून तेथील मृत्यूदर हा 1.5 इतका आहे. दिल्लीत 3.48 लाख रूग्ण असून तेथे आतापर्यंत 6 हजारांहून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई हे देशातील मोठ्या प्रमाणात बाधित होणारे पहिले शहर आहे. रेमडेसिवीर , टॉसिलिझुमॅबसारखी औषधं देखील रुलै दरम्यान उपलब्ध झाली. तो पर्यंत मुंबईतील मृतांचा आकडा वाढला होता. त्यातच दीर्घकालीन आजारी असणाऱ्या रूग्णांना कोरोनाचा मोठा फटका बसला. अनेक वयोरूद्ध रूग्ण बरे होऊन गेले मात्र 50 वयोगटातील अनेक दीर्घकालीन रूग्णांचा मृत्यू झाल्याने आकडा वाढल्याचे दिसते.  मात्र जूनमध्ये रेमडेसिवीर सारखी औषधं उपलब्ध झाल्यानंतर आयसीयूमधील रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण 30 ते 50 टक्क्यावरून 10 ते 20 टक्क्यांवर आल्याचे कोकिलाबेन रूग्णालयाच्या संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ.तनू सिंघल यांनी सांगितले.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

More victims of Covid 19 Mumbai due diabetes pancreas obesity high blood pressure

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com