शिक्षिकेचे नग्न फोटो पाठवले विद्यार्थी अन् पालकांच्या फोनवर; गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nude Photo

शिक्षिकेचे नग्न फोटो पाठवले विद्यार्थी अन् पालकांच्या फोनवर; गुन्हा दाखल

कल्याण : कल्याणमध्ये एका अनोळखी व्यक्तीने शिक्षिकेचे नग्न फोटो त्यांच्याच विद्यार्थ्यांना पाठवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षिका महिलेने नग्न फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे.

दरम्यान व्हायरल केले गेलेले फोटो हे कॉम्प्यूटरवर तयार केलेले आहेत. तयार केलेले नग्न फोटो फिर्यादी शिक्षिकेच्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आलेले असून एका अनोळखी नंबरवरुन शिक्षिकेच्याही मोबाईलवर नग्न फोटो पाठवण्यात आले होते.

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईवरही फोटो पाठवण्यात आल्यावर पालकांकडून शिक्षिकेला यासंबंधित विचारण्यासाठी फोन आले होते. यानंतर शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान या अगोदरही अशा अनेक घटना घडल्या आहे. सहा वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एका शिक्षिकेने या प्रकरणामुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या फोनमधून नग्न फोटो घतले आणि आपल्या मित्रांना पाठवले होते. या प्रकरणाने शिक्षिकेला राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं होतं.

टॅग्स :Mumbai Newscrime