esakal | मुंबईकरांना गुड न्यूज! कोरोना रुग्णांसह मृत्युदरही घटला, जाणून घ्या आकडेवारी
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 107 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या 2043 झाली आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 116 वर गेला आहे. दरम्यान, मुंबईत कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे आणि मृत्यूचेही प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. 

मुंबईकरांना गुड न्यूज! कोरोना रुग्णांसह मृत्युदरही घटला, जाणून घ्या आकडेवारी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 107 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या 2043 झाली आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 116 वर गेला आहे. दरम्यान, मुंबईत कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे आणि मृत्यूचेही प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. 

महत्वाची बातमी अत्यावश्यक सेवांसाठीचे पास 3 मे पर्यंत वैध

मृत्यू झालेल्या काही रुग्णांना मधुमेह व उच्च रक्तदाबासारखे दीर्घकालीन आजार होते. कस्तुरबा रुग्णालयात दोघांचा, तर लोकमान्य टिळक रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. दोन दिवसांपासून कोरोनाची लागण व मृत्युदरात घट झाली आहे..

मोठी बातमीगलथान कारभार ! ३० तास रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये पाहिली बेडसाठी वाट; मग मिळाले कोरोनाग्रस्त महिलेला उपचार...

गुरुवारी 299 संशयित रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यामुळे संशयित रुग्णांची संख्या 5687 झाली आहे. आणखी 21 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, आतापर्यंत बऱ्या झालेल्या 202 जणांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे.

loading image
go to top