esakal | BMC: ड्राेनच्या माध्यमातून डासांचा शोध, 'फाईट द बाईट' मोहिमेचा प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

Drone

ड्राेनच्या माध्यमातून डासांचा शोध, महापालिकेची 'फाईट द बाईट' मोहिम

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : उंच अडगळीत असलेले मलेरीया (Malaria) डेंगी पसरवणाऱ्या डासांचे (Mosquitoes) अड्डे शोधण्यासाठी पूर्वी महानगरपालिकेच्या (BMC) कामागरांच्या जिवाचा खेळ व्हायचा. पण,आता या कामगारांना जिव धोक्यात घालण्याची गरज नसून ड्रोनच (Drone) आता डासांच्या अड्ड्यांचा वेध घेऊन त्यांचा नाश करणार आहे. महानगर पालिकेच्या 'फाईट द बाईट' मोहीमे अंतर्गत ड्रोनच्या माध्यमातातून डास प्रतिबंधक उपायांची (Treatments) सुरवात आज वरळीतून (Worli) उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उपस्थीतीत झाली. (Mosquitoes Searching Drone by BMC For people safety in malaria-nss91)

हेही वाचा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका

बंद गिरण्याचे छत,जुन्या चाळींचे छत,रेल्वे यार्ड अशा ठिकाणी मलेरीया,डेंगी पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती स्थाने असतात.या भागात पावसाचे पाणी साचून त्यात डासांचे पोषण होते.अशा ठिकाणी डासांचे अड्डे शोधण्यासाठी पालिकेची कामगार पुर्वी उंच शिड्या लावून मोडकळीस आल्यावर छतांवर चढत होते.नागरीकांचे जिव वाचविण्यासाठी पालिकेचे कामगार स्वत:चा जिव धोक्यात घालत होते.यावर आता ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे.या ड्रोनचे काम आज पासून सुरु झाले आहे.यावेळी माजी राज्यमंत्री सचिन अहिर,माजी आमदार सुनिल शिंदे उपायुक्त विजय बालमवार,सहाय्यक आयुक्त शरद उघडे,उपस्थीत होते.

हेही वाचा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका

काय करेल ड्रोन

प्रकल्प, विकासकामांमध्ये सर्वेक्षण-मॅपिंग करावे लागते. मात्र दाटीवाटीची वस्ती आणि नैसर्गिक अडथळ्यांमुळे या कामावर मर्यादा येतात. आता आणलेल्या ड्रोनच्या माध्यमातून मॅपिंग-सर्वेक्षणाचे कामही प्रभावी होणार आहे.ड्रोनवर रिमोट कंट्रोलने नियंत्रण ठेवता येणार आहे. कॅमेरा आणि स्वयंचलित यंत्रणेमुळे उंच ठिकाणचे डासांची उत्पत्तीस्थाने, साठलेल्या पाण्याच्या जागा छायाचित्रासह मिळणार आहे.औषधांची फवारणीही करता येणार आहे.असे सांगण्यात आले.

loading image