लॉकडाऊनमध्ये आईच बेस्ट! ब्रेनली सर्वेक्षणातील निरीक्षण, वाचा

mother
mother
Updated on

मुंबई : देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वत्र वर्क फ्रॉम होम संकल्पना राबवली जात आहे. या काळात आई घरातूनच कार्यालयीन काम करण्यासह मुलांच्या अभ्यासाकडेही विशेष लक्ष देत असल्याचे निरीक्षण ब्रेनली ऑनलाईन मंचाने नोंदवले आहे.

विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या ब्रेनली या ऑनलाईन मंचाने मदर्स डे निमित्त सर्वेक्षण केले होते. लॉकडाऊन काळातील शिक्षणपद्धती जाणून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या या सर्वेक्षणात देशभरातील 3267 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांच्या बहुतेक माता वर्किंग वुमन होत्या. लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरच्या काळात मुलांच्या शिक्षणात आईची भूमिकाच महत्त्वाची असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. 

लॉकडाऊनमध्ये दोन्ही पालक घरीच असले, तरी आई  अभ्यासात अधिक भाग घेते, असे 43.6 टक्के मुलांनी सांगितले. अभ्यासात वडिलांची अधिक मदत होते, असे 19.5 टक्के मुले म्हणाली. घरातून कार्यालयीन काम, घरातील काम आणि मुलांना अभ्यासात मदत यांची योग्य सांगड आईच घालत असल्याचे मुलांनी नमूद केले. होम स्कूलिंगमध्ये ऑनलाईन शिक्षकांकडून सर्वांत जास्त मदत मिळत असल्याचे 52 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर आई (41 टक्के), बाबा (27 टक्के), भाऊ-बहीण (17 टक्के) यांची मदत मिळते, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. 

ई-लर्निंग की शाळा? 
सध्या विद्यार्थ्यांचे होम स्कूलिंग सुरू असून, विविध ऑनलाईन मंचांचा आधार घेतला जात आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 30 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती आवडत असल्याचे सांगितले. जवळपास 37 टक्के विद्यार्थ्यांनी मात्र ई-लर्निंगपेक्षा शिक्षणाची पारंपरिक पद्धतच पसंत असल्याचे नमूद केले. असे दूरस्थ शिक्षण आव्हानात्मक असल्याचे मात्र 48 टक्के विद्यार्थी म्हणाले. सुमारे 33 टक्के विद्यार्थ्यांनी ही पद्धतही चांगली वाटते, असे मत व्यक्त केले.

mother Best in Lockdown! Observations from the Brainley survey, read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com