काय चाललंय काय ? मुंबईत पुन्हा एकदा पोलिसांवर जीवघेणा हल्ला, तीन पोलिस गंभीर जखमी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

अँटॉप हिल येथे मुंबई पोलिसांवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

मुंबई : अँटॉप हिल येथे मुंबई पोलिसांवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. अँटॉप हिल परिसरातल्या कोकणी आगारमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत दोन पोलिस शिपायांसह एक पोलिस उपनिरीक्षक जखमी झालेत. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिस स्टेशन या टोळक्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हल्लेखोरांमध्ये 5 ते 6 महिलांचा समावेश आहे. सर्व 17 आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सावध व्हा ! कोरोनानंतर मुलांना होतोय 'कावासाकी' आजार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

लॉकडाऊनचं उल्लंघन करण्यास मनाई केल्यानं हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. तिन्ही पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात कारण नसताना काही लोकं रस्त्यावर फिरत होते. पोलिसांनी रात्री परिसरात पेट्रोलिंग सुरु केलं होतं. त्यावेळी कोकणी आगारात काही तरुण चौकांत घोळका करुन उभे होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकलं. मात्र तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यावेळी तरुणांनी पोलिसांवर दगडफेक करत कोयत्यानं हल्ला देखील केला. जवळपास 10 ते 15 जणांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. या घटनेत 2 पोलिस शिपाई आणि एक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत बुद्धे गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

'18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...

मरिन ड्राईव्हवर पोलिसांवर तरुणाचा कोयत्याने हल्ला

गेल्याच आठवड्यात मुंबईत नाकाबंदीला असणाऱ्या दोन पोलिसांवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. मरिन ड्राईव्हवर रात्री अकरा वाजता ही घटना घडली. या हल्ल्यात पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलिस उपनिरीक्षक शेळके जखमी झाले असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. रात्री फिरत असताना पोलिसांनी केवळ हटकलं म्हणून या तरुणानं कोयत्याने हल्ला केला होता.

लॉकडाऊनमध्ये पोलिसांवर हल्ल्याच्या वाढत्या घटना

राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोना व्हायरस संदर्भातील 1 लाख 6 हजार गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 218 घटना घडल्या. त्यात 770 व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांसदर्भातली माहिती दिली आहे.

once again cops in mumbai attacked at antop hill read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: once again cops in mumbai attacked at antop hill read full news