मिलेगा...करारा जवाब मिलेगा!; अमोल कोल्हेंचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

ईडीचा कुटील डाव न समजायला माणसं काही येडी नाहीत. मिलेगा...करारा जवाब मिलेगा. याबरोबरच त्यांना आय सपोर्ट शरद पवार असे लिहिलेला फोटोही टाकला आहे. ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी मिलेगा...करारा जवाब मिलेगा! असे ट्विट केले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपल्या ताब्यात घेतले असून, 'मनी लॉंडरिंग' प्रतिबंधक कायद्याखाली या प्रकरणाची नोंद केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नावाचा समावेश आहे. 'ईडी'च्या वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा यात समावेश नसला, तरी त्यासंदर्भातील पुष्टीच्या कागदपत्रांमध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे आणि इतरही अनेक राजकीय नेत्यांची नावे आहेत. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तर, बारामती बंद ठेवण्यात आली आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ईडीचा कुटील डाव न समजायला माणसं काही येडी नाहीत. मिलेगा...करारा जवाब मिलेगा. याबरोबरच त्यांना आय सपोर्ट शरद पवार असे लिहिलेला फोटोही टाकला आहे. ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Amol Kolhe warned government on case filed against Sharad Pawar