
KDMC News
Sakal
डोंबिवली : नवी मुंबईतील 14 गावाप्रमाणेच केडीएमसीतील 27 गावे पण उद्या बाहेर काढणार असे सत्ताधारी बोलतील. मग निवडणुकीवर होणाऱ्या खर्चाचे नुकसान कोण भरणार. त्यापेक्षा ही निवडणूक रद्द करा, 14 गाव, 27 गाव आत्ताच बाहेर काढा. त्यांची स्वतंत्र नगरपरिषद, महानगरपालिका करा आणि घ्या निवडणुका. यात राजकारण कशाला करता, जनतेचे कराचे पैसे कशाला वाया घालवता असा संतप्त सवाल खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सत्ताधारी प्रशासनावर व निवडणूक आयोगाला केला. तसेच 27 गावासाठी वेळ आली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा इशारा ही दिला आहे.