
Suresh Mhatre on Navi Mumbai Airport Naming
ESakal
डोंबिवली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकार बरोबरच इतर राजकीय पक्ष, संघटना व स्थानिक भूमिपुत्र सकारात्मक असतानाही केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असून विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्याबाबत जाणीवपूर्वक चालढकल व वेळकाढू पणा करत आहे. मात्र जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचे नाव देण्यात येत नाही तोपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्र सरकारला दिला आहे.बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.