Naresh Maske : खासदार होताच नरेश मस्के ॲक्शन मोडवर; 'या' कारणावरून अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, असं काय घडलं?

खासदार होताच नरेश मस्के (Naresh Maske) इन ॲक्शन मोडवर आले आहेत.
MP Naresh Maske
MP Naresh Maskeesakal
Summary

पावसाळ्याचे दिवस असून येत्या दोन दिवसात पडलेले रॅबिट तातडीने उचलण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या.

ठाणे : खासदार होताच नरेश मस्के (Naresh Maske) इन ॲक्शन मोडवर आले आहेत. दिवसभर विजयाच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर आज (बुधवार) सायंकाळी नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. स्थानकात ठिकठिकाणी पडेल्या राडारोडावरुन त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना (Railway Officer) चांगलेच धारेवर धरले. तसेच फलाट क्रमांक ५ च्या रुंदीकरणाची पाहणी केली.

MP Naresh Maske
Kolhapur Lok Sabha Results : के. पी., आबिटकर, क्षीरसागर, नरकेंसाठी धोक्याची घंटा; मुश्रीफ, समरजितसिंह यांनाही विधानसभा नाही सोपी!

खासदार नरेश म्हस्के यांनी फलाट क्रमांक १, २ आणि ५ ची पाहणी केली. तेव्हा त्यांना फलाटावर ठिकठिकाणी राडारोडा पडलेला दिसला. पावसाळ्याचे दिवस असून येत्या दोन दिवसात पडलेले रॅबिट तातडीने उचलण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या. रेल्वे प्रवाशांशी (Railway passengers) दौऱ्या दरम्यान नरेश म्हस्के संवाद साधला. प्रवासी प्रतिक्षालयाला भेट देत तातडीने गंजलेली बाकडी बदलण्याच्या सूचना केल्या.

MP Naresh Maske
Kolhapur Lok Sabha Results : बालेकिल्ल्यांनी केला मंडलिकांचा घात; शाहू महाराजांना जिंकवत सतेज पाटील ठरले 'किंगमेकर'

फलाटांवरील पाणपोई, शौचालयांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबरोबरच पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना नरेश म्हस्के यांनी केली. फलाटांवर येत असलेल्या दुर्गंधीवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्टेशन मास्तरांना निर्देश म्हस्के यांनी दिले. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत आहेत. मोठमोठ्या सुविधा आम्ही देऊ पण प्राथमिक सुविधाही देणे तितकेच गरजेचे आहे. रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यावर आमचा भर असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com