Kolhapur Lok Sabha Results : के. पी., आबिटकर, क्षीरसागर, नरकेंसाठी धोक्याची घंटा; मुश्रीफ, समरजितसिंह यांनाही विधानसभा नाही सोपी!

करवीरमधून शाहू महाराजांना ७० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले.
Kolhapur Lok Sabha Election Results
Kolhapur Lok Sabha Election Resultsesakal
Summary

कोल्हापूर उत्तरचे दोनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचाही यावेळी प्रभाव पडला नसल्याचे मताधिक्यावरून दिसून येते.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचा (Kolhapur Lok Sabha Election Results) निकाल आणि विधानसभा मतदारसंघनिहाय पडलेली मते पाहता संभाव्य महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यातही राधानगरीत आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar), माजी आमदार के. पी. पाटील, करवीरमध्ये माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासाठी विधानसभा सोपी नसल्याचे संकेत निकालातून मिळत आहे.

दरम्यान, पक्षापेक्षा गटातटाला महत्त्व असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) व भाजप नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) लोकसभेला एकत्र असले तरी दोघांच्या दृष्टीने विधानसभा सोपी नसल्याची चाहूल या मतदारसंघातील खासदार प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेल्या मतातून दिसत आहे. या मतदारसंघातील माजी आमदार संजय घाटगे विधानसभेला काय करणार? यावर या मतदारसंघातील विजयाचे गणित अवलंबून आहे.

Kolhapur Lok Sabha Election Results
Sangli Result : विशालचा विजय एक आणि परिणाम अनेक..; दोघांना हलक्यात घेणं भाजपला पडलं महाग, सांगली काँग्रेसचाच बालेकिल्ला

राधानगरी मतदारसंघात विद्यमान आमदार आबिटकर, माजी आमदार के. पी., भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई एकत्र असून अपेक्षित मताधिक्य प्रा. मंडलिक यांना मिळाले नाही. याउलट काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी ६० हजारांपेक्षा जास्त मते घेतली.

करवीरचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील व शाहू महाराज यांच्यातील मैत्रीचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यातून पाटील यांनी स्वतः उमेदवार असल्यासारखा प्रचार केला. त्यातून करवीरमधून शाहू महाराजांना ७० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. पी. एन. पाटील यांचे अकाली निधन, त्यातून मिळणारी सहानुभूती आणि लोकसभेतील शाहू महाराज यांचे मताधिक्य पाहता या मतदारसंघातील शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांना विधानसभा सोपी वाटत नाही.

Kolhapur Lok Sabha Election Results
Sangli Lok Sabha Result : चंद्रहार पाटलांचा 'अभिमन्यू'च; राजकारणात अनामत जप्त होणं मानहानीकारकच!

कोल्हापूर उत्तरचे दोनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचाही यावेळी प्रभाव पडला नसल्याचे मताधिक्यावरून दिसून येते. आता विधानसभेला त्यांच्या विरोधात कोण? यावरच लढतीचे चित्र अवलंबून आहे. तरीही क्षीरसागर यांच्यादृष्टीने शाहू महाराजांना मिळालेले मताधिक्य आत्मचिंतन करायला लावणारे आहे. अशीच परिस्थिती चंदगड विधानसभेची आहे. त्याठिकाणी प्रा. मंडलिक यांचे मेव्हणे राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत, पण तेही प्रा. मंडलिक यांना मताधिक्य देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासह भाजप नेते शिवाजी पाटील यांच्यासमोर विधानसभेला मोठे आव्हान असेल.

विधानसभेची गणिते वेगळी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील गणिते वेगळी असतात. २०१९ च्या लोकसभेला ज्या मतदारसंघात प्रा. मंडलिक यांना जादा मते मिळाली, तशीच परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत राहिली नाही. परिणामी, लोकसभेचे पडसाद विधानसभेत किती प्रभावी राहतील यासाठी विधानसभेच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.

Kolhapur Lok Sabha Election Results
काँग्रेसचे 'हे' उमेदवार कर्नाटकात ठरले जायंट किलर; बिदरमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा तर, चिक्कोडीत विद्यमान खासदाराचा केला पराभव

‘दक्षिण’मध्ये महाडिक प्रभावी

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील वादाने नेहमी गाजणाऱ्या कोल्हापूर दक्षिणमध्येही काँग्रेस उमेदवार म्हणून शाहू महाराजांना अपेक्षित मताधिक्य मिळालेले नाही. २०१९ च्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक विरोधात असताना प्रा. मंडलिक यांना ४६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी फक्त दहा हजारांच्या आसपास शाहू महाराजांना मताधिक्य मिळाल्याने या मतदारसंघात महाडिक प्रभावी ठरल्याचे दिसते. त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना अजून तयारी करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com