
ठाणे : देशाची राष्ट्रीय धोरणे, महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकासकामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा `संसद रत्न' पुरस्कार नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्यांक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये मला हा पुरस्कार मिळाला असून जबाबदारी देखील वाढली असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.