इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करा, 'या' खासदाराचे दिल्लीत निवेदन

rahul shevale
rahul shevalesakal media
Updated on

मुंबई : पासपोर्ट (passport) जप्त करण्यात आल्याने गेल्या दीड वर्षांपासून इराणमध्ये (Iran) अडकलेल्या पाच निर्दोष तरुणांना (youngsters) देशात आणण्यासाठी (India) त्वरित कारवाई करावी आणि इराणमधील भारतीय दूतावसाला (Indian Embassy) तसे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर (Subrahmanyam Jaishankar) यांच्याकडे केली. पराराष्ट्रमंत्र्यांची दिल्लीतील (Delhi) कार्यालयात भेट घेऊन खासदार शेवाळे यांनी यासंदर्भातील निवेदनही मंत्र्यांना सादर केले. ( MP rahul shevale demands to external Affairs for Indian people stuck In Iran returning to India - nss91)

rahul shevale
धारावीत महापालिकेची विशेष लसीकरण मोहिम, 'हा' आहे BMC चा टार्गेट

गेल्या दीड वर्षांपूर्वी इराणमध्ये दाखल झालेल्या पाच भारतीय तरुणांना इराण पोलिसांकडून अटक करण्यात आले होते. या तरुणांवर अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप ठेवून तुरुंगात डांबण्यात आले होते. मात्र, प्रकरणातुन त्यांची निर्दोष सुटका होऊनही, पासपोर्ट जप्त केल्याने, गेल्या चार महिन्यांपासून हे तरुण इराणमध्ये अडकून पडले आहेत. यातील मंदार वरळीवर आणि अनिकेत एनपुरे हे चुलत भाऊ मुंबईच्या वरळीतील रहिवासी आहेत.

यांच्या कुटुंबियांकडून भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असूनही अद्याप या निर्दोष तरुणांची सुटका होऊ शकलेली नाही. या तरुणांना भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश इराणमधील भारतीय दूतावसाला द्यावेत, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात केली आहे. यापूर्वीही खासदार शेवाळे यांनी याप्रकरणी पंतप्रधानांकडे देखील लेखी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com