खासदार संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut maitri bungalow crowd

संजय राऊतांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याची वार्ता पसरताच शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले होते.

खासदार संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष!

चेंबूर - संजय राऊतांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याची वार्ता पसरताच शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले होते. नेत्यांचे स्वागत करण्याकरिता परिसरातील शिवसैनिकांनी बंगल्यावर सकाळ पासून गुलाल, फटाके, फुलांचा गुच्छ व भगवा झेंडा घेऊन सज्ज होते तसेच निवासस्थानी दुपारीच डीजे मागविला होता. बंगल्याला बाहेर व आत रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात आली होती.

बंगला वर लायटिंग व कंदिल लावल्याने मैत्री बंगला कंदील व दिव्याच्या प्रकाशात झळाळून गेला होता. आपला नेता आता येणार म्हणून कार्यकर्त्यांनी बंगल्यावर गर्दी केल्याने बंगल्याला छावणीची रूप आले होते. घराला लायटिंग, कंदील व व कार्यकर्ते एकमेकांना लाडू, पेढे भरवीत असल्याने मैत्री बंगल्यावर दिवाळी उत्सव साजरा होत असल्याने सारखे वाटत होते.

आपला मुलगा कित्येक दिवसाने घरी येणार म्हणून आई व पत्नी व मुली व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जंगल मे शेर आ चुका है! आला रे आला! कोण आला! शिवसेनेचा वाघ आला ! असे परिसरात सर्वत्र बॅनर लावण्यात आले होते. बंगल्यावर डीजे व फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात येत होता. महिला कार्यकर्त्यानी शिवसेना , शिवसेना, महाराष्ट्र माझा, चंद्रा गाण्याच्या ठेक्यावर नाचत एकच जल्लोष केला.

आवाज कुणाचा शिवसेनाचा! राऊत साहेबाचा विजय असो! अशा कार्यकर्त्या घोषणां देत परिसर घोषणाने दणाणून सोडला होता.

राऊत कधी येणार व त्याची कधी भेट होणार याची सर्वाना उत्सुकता लागली होती. याबाबत आई विचारणा केली असता माझा मुलगा खूप दिवसांनी घरी येणार आसल्याने आनंद होत आसल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया- शालीन पवार (शिव सैनिक)

कारण नसताना आमच्या नेत्याला कारावास भोगावा लागला. लोकशाही आहे. लोकशाहीत सत्याचा नेहमी विजय असतो. आज विजय झाला आहे. याचा मला अभिमान आहे.

प्रतिक्रिया- प्रकाश सुर्वे (शिवसैनिक)

आनंद होत आहे. साहेब निर्दोष आहेत. हा लोकशाहीचा विजय आहे. आज आमची खरी दिवाळी आहे.