esakal | एमपीएससीच्या परीक्षार्थींना लोकल प्रवास खुला; हॉल तिकीट दाखवून मिळणार तिकीट
sakal

बोलून बातमी शोधा

mpsc

एमपीएससीच्या परीक्षार्थींना लोकल प्रवास खुला; हॉल तिकीट दाखवून मिळणार तिकीट

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)ची शनिवारी, (ता. 4 ) रोजी परीक्षा होणार आहे. त्यामुळे मुंबई (Mumbai) महानगरातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर (exam center) वेळेत पोहोचण्यासाठी उपनगरीय लोकलचा (Mumbai train) पर्याय उत्तम आहे. यासाठी एमपीएससीच्या परीक्षार्थींना हॉल तिकीट (hall ticket) दाखवून लोकल तिकीट दिले जाईल, अशी माहिती मध्य, पश्चिम रेल्वे प्रशासनाने (western railway) दिली.

हेही वाचा: BMC : जंबो कोविड केंद्रामध्ये मुलांसाठी क्यूबिकल्स वॉर्ड

मुंबई महानगरातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी लोकल प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी केली होती. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क करून ही मागणी केली. त्यानंतर अधिकृत हाॅल तिकिट दाखवून रेल्वे तिकिट देता येईल, असे दानवे यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवार, (ता. 3) रोजी मध्य रेल्वेने एमपीएससीच्या परिक्षार्थींना शनिवारी, (ता.4) रोजी हाॅल तिकिट दाखवून लोकल प्रवास करण्याची मुभा दिली आहे.

परिक्षाकेंद्रावर वेळेआधी पोहचणे महत्त्वाचे असते. बस, एसटी, खासगी गाडी किंवा टॅक्सीमधून प्रवास केल्यास वाहतूककोंडीचा अडथळा येऊ शकत होता. मात्र, आता लोकल प्रवास सुरू केल्याने परिक्षा केंद्रावर वेळेत आणि वेगात पोहचता येणार आहे, अशी प्रतिक्रिया एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी दिली.

loading image
go to top