

MSRTC Mobility Card
ESakal
कासा : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (एसटी)मधून प्रवास करणाऱ्या सवलतधारी तसेच विनासवलतधारी प्रवाशांसाठी ‘रुपे ऑन द गो-एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांनी परिपत्रक जारी केले आहे.