ST Bus: लालपरी सहलीला, प्रवाशांना फटका! अनेक विभागात गाड्यांचा तुटवडा, नियमित प्रवाशांची गैरसोय
MSRTC Update: शालेय सहलींसाठी एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे अनेक विभागांत एसटी बसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे.
मुंबई : शालेय सहलींसाठी एसटी महामंडळाकडून बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. शालेय सहलींमुळे सध्या अनेक विभागांत एसटी बसचा तुटवडा जाणवत असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.