

MSRTC Plans 200 AC Volvo Buses Including 30 Sleeper Buses To Offer Comfortable Long Distance Travel And Online Booking
sakal
मुंबई : खासगी आराम बस सेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्व्हो बस दाखल करण्यात येणार आहेत. यामध्ये ३० शयनयान बसचा समावेश आहे. यात सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम पाहायला मिळेल, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.